धामणगाव | एसएमबीटी विशेष
स्ट्रोक म्हणजे पॅरालिसीसचा ॲटॅक अथवा लकवा, याला ब्रेन ॲटॅक असेही म्हटले जाते. ऑक्सिजन आणि पौष्टिक द्रव्यांचा मेंदूला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडचणी येतात अशा वेळी स्ट्रोक बसत असतो.
एकदा प्राणवायूच्या कमतरतेमुळे पेशी मरायला लागल्या की, मेंदूच्या त्या विशिष्ट भागावरील नियंत्रण कमी होऊन त्याची परिणती पक्षाघात किंवा अर्धांगवायू होण्यात होते.
स्ट्रोक हा जागतिक पातळीवर वाढणारा गंभीर आजार आहे. दरवर्षी जगामध्ये ८ लाखापेक्षा अधिक लोकांना हा आजार उद्भवतो. त्याची लक्षणे तत्काळ ओळखणे तसेच त्वरित उपचार आवश्यक आहेत.
जागतिक स्ट्रोक दिवस दरवर्षी २९ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो, ज्यामुळे लोकांना या प्राणघातक आजाराबद्दल जागरुकता मिळावी. महिला आणि पुरुषांमध्ये स्ट्रोक येण्यापूर्वी कोणत्या प्रकारची लक्षणे दिसतात ते जाणून घेऊया.
ही आहेत स्ट्रोकची लक्षणे
1. ऐकू कमी येणे
2. दृष्टी कमी होणे
3. अचानक चक्कर येणे
4. तीव्र डोकेदुखी
स्ट्रोक कसा ओळखावा?
हात : रुग्णाला दोन्ही हात वर करण्यास सांगा. तो हात उचलू शकत नाही का ते पाहा.
भाषण : रुग्णाला काहीतरी वाचण्यास सांगा. त्याच्या बोलण्यावर लक्ष ठेवा.
वेळ : वरील निरीक्षण संशयास्पद वाटल्यास ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या.
0 comments:
Post a Comment