10 TIPS TO GET GOOD PHOTOGRAPHS (MARATHI)



आयुष्यात अनेकदा खूप सुंदर असे क्षण अनुभवायला मिळतात आणि आपल्या हृदयात राहतात त्या आठवणी. अश्या अनेक प्रिय असलेल्या क्षणांची यादगिरी म्हणून ते क्षण आपण टिपतो ते आपल्या डोळ्यांनी आणि कॅमेरानी.
काढलेला प्रत्येक फोटो आपल्याला काहीतरी सांगत असतो, बोलत असतो. त्या फोटो मधून एक गोष्ट निर्माण होत असते जी आपल्या आयुष्याच्या प्रवासात भर पाडते. त्या फोटो मधून दिसणारी ती गोष्ट बघण्याचं सामर्थ्य देखील एक कलाच आहे. तुमची ती कला अधिकाधिक बहरून आणण्यासाठी SMBT कॉलेज सादर करतंय एक Photography Contest आपल्या Facebook Page वर.

ह्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरिता तुम्हाला लागेल एक कॅमेरा आणि फोटोग्राफी बद्दलचं प्रेम. पण त्याचबरोबर तुम्हाला लागतील काही टिप्स आणि थोडीशी मदत. तर, SMBT देतंय तुम्हाला काही फोटोग्राफी टिप्स जेणेकरून ह्या स्पर्धेमध्ये तुम्ही जिंकू शकाल एक आकर्षक बक्षीस.

  1. Get it close: फोटो काढताना संपूर्ण फ्रेम भरणे गरजेचे नसले तरी हि काळजी घेणे महत्वाचे आहे की खूप जागा वाया जाऊ नये. फ्रेम आणि निर्धारित फोकस्ड इमेज मध्ये साम्य आणण्यासाठी सब्जेक्ट च्या थोडं जवळ जावे. त्याने एक्सप्रेशन्स देखील नीट टिपता येतील.
  2. Hold your camera properly: कॅमेरा आपल्याला वाटेल तसा न धरता अगदी काळजीपूर्वक व नीट धरणे खूप महत्वाचे असते. फोटो ची क्लॅरिटी, कॅमेरा वर असलेली तुमची ग्रिप आणि स्टेबिलिटी निर्धारित करते. कॅमेरा ला हाताचा एक बेस निर्माण झाला पाहिजे जेणेकरून तो हलणार नाही व दुसरा हात मोकळा राहील.
  3. Rule of thirds: फोटोग्राफी मधील हा सर्वात महत्वाचा पॉईंटआहे. तुम्ही काढत असलेल्या फोटोची फ्रेम उभी किंवा आडवी १/३ मध्ये विभाजित करा. त्या भागात किंवा त्या भागांच्या इंटरसेक्शन मध्ये तुमचा निर्धारित सब्जेक्ट आणण्याचा प्रयत्न करा.
  4. Be present: आजूबाजूच्या परिसरावर आणि घडणाऱ्या घडामोडींवर काळजीपूर्वक लक्ष असणे हि एक मोठी आणि खूप महत्वाची बाब आहे. अनेकदा नकळत काही सुंदर गोष्टी किंवा क्षण टिपल्या जाऊ शकतात जे कि आपला खरा उद्देश्य आहे.
  5. Exposure: तुमच्या कॅमेरा मध्ये किती लाईट जातीये ह्यावर देखील तुमच्या फोटो ची क्वालिटी निर्धारित होते. खूप लाईट फोटो ला अगदीच पांढरा करेल तर कमी लाईट मुळे तो काळपट दिसेल. व्यवस्थित प्रमाणात असलेली लाईट तुम्हाला एक चांगला कॉन्ट्रास्ट चा फोटो देईल.
  6. Keep your batteries charged: This वाचून खूप सोप्पी आणि वायफळ वाटत असलेली हि गोष्ट फार महत्वाची आहे. शूटिंग वरून आल्यावर बॅटरी चार्जिंग ला लावणे हे विसरण्याइतपत चुकीची बाब कुठलीच न्हवे. अनेकदा "बॅटरी लो आहे" चे किस्से सर्वांबरोबर घडलेच असतात आणि म्हणून हि देखील एक टीप आहे.
  7. Take Inspiration: दुसऱ्यांच्या कलेतून शिकणे देखील एक कलाच आहे. वेगवेगळी मॅगझिन्स, पुस्तकं, वेबसाईट्स आणि फोटोस वारणा माहिती मिळवावी, फोटोस बघावे, निरीक्षण करावे. त्या फोटोग्राफर ला फोटो मधून काय सांगायचे आहे आणि ते त्यांनी कसे सांगितले आहे हे बघावे. तुम्हाला काय पटले, काय आवडले आणि काय नाही आवडले ह्याचे भान ठेऊन आपली स्टाइल निवडावी.
  8. Be a part of photography community: फोटोग्राफी संबंधित अनेक ग्रुप्स आणि कॅम्युनिटीस आहेत जे तुम्हाला तुमचे फोटोस पब्लिश करू देतील, त्यावर टिप्पणी देतील आणि अनेक नवनवीन गोष्टी, टिप्स आणि पॉईंट्स सांगतील. अश्या ग्रुप्स चे सदस्य होऊन तुम्हाला फोटोग्राफी मध्ये खूप मदत होऊ शकते.
  9. Break the rules: कुठेही रूल्स माहिती असणे हि एक बाब आहे पण ते माहिती असून ते आपल्या प्रमाणे वळवून घेणे हि दुसरी. रूल्स असले तरी त्यांबरोबर एक्सपेरिमेंट करणे कधीच सोडू नये. नवीन गोष्टी तरी करणे, ते चुकणे आणि तरीही करत राहणे ह्यातच खरी मज्जा आहे.
  10. Shoot regularly: “प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट"आणि म्हणूनच फोटोग्राफी चा मास्टर होण्यासाठी फोटो काढणे कधीच थांबवू नये. प्रत्येक क्षण मोलाचा आहे आणि प्रत्येक फोटो महत्वाचा! तुमचे स्किल्स, कॉम्पोसिशन आणि फोटोग्राफीची आवड तुम्ही सतत फोटोग्राफी करून बहरून येतील.

ह्या टिप्स वाचून तुम्हाला तुमच्या पर्सनल फोटोग्राफी मध्ये आणि SMBT च्या फोटोग्राफी स्पर्धे मध्ये मदत होईल!
तुमचे फोटोस SMBT page वर पोस्ट करा किंवा त्याची लिंक इथे शेअर करा आणि आमच्या फोटोग्राफी एक्स्पर्ट कडून आणखीन टिप्स मिळवा.
आपण मिळून एक SMBT Photography Community तयार करून आपापसातील प्रेम वाढवूया

ALL THE BEST!

SMBT Group of Institutions

Author & Editor

Has laoreet percipitur ad. Vide interesset in mei, no his legimus verterem. Et nostrum imperdiet appellantur usu, mnesarchum referrentur id vim.

0 comments:

Post a Comment